नवी दिल्ली : उरी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान विरोधात कडक भूमिका घेण्यास सुरुवात केली आहे. भारताचं लष्कर हे पूर्णपणे सज्ज आहे. भारताची ही तयारी पाहून पाकिस्तान घाबरलं आहे. पाकिस्तान राजस्थानशी जोडल्या गेलेल्या बॉर्डरवर युद्धअभ्यास करतोय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मीडिया रिपोर्ट्सनुसार पाकिस्तानचं लष्कर हे वायुसेनेसोबत एकत्र युद्ध अभ्यास करत आहे. भारतीय सिमेपासून फक्त १५ किलोमीटरवर हा युद्धअभ्यास सुरु केला आहे.
पाक सैन्यातील १५ हजार जवान आणि ३०० एयरफोर्स कर्मचारी या युद्धअभ्यासात सहभागी झाले आहेत. उरी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये संबंध ताणले गेले आहेत. पाकिस्तानच्या सुरु असलेल्या युद्धअभ्यासानंतर बीएसएफ देखील अलर्ट झाला आहे.


सीमेवर रणगाडे आणि पाकिस्तानच्या लढाऊ विमानांचा आवाज येत आहे. जवानांचं मनोबल वाढवण्यासाठी पाकिस्तानचे उच्च अधिकारी देखील युद्ध अभ्यासाच्या ठिकाणी येत आहेत.