पाकिस्तानातही `सैराट`ची पुनरावृत्ती
एका मुलीने स्वत:च्या मनाने तिला आवडतो त्या मुलासोबत लग्न केल्यामुळे तिच्या आईने आणि भावाने पेट्रोल टाकून जाळल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
लाहोर : एका मुलीने स्वत:च्या मनाने तिला आवडतो त्या मुलासोबत लग्न केल्यामुळे तिच्या आईने आणि भावाने पेट्रोल टाकून जाळल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
जीनत नावाच्या या तरुणीचं तिच्या समोर राहणाऱ्या हसन नावाच्या मुलावर प्रेम होतं. मुलीने याबाबत घरी सांगितलं पण त्यांना हे मान्य नव्हतं. त्यामुळे आईने आणि भावाने तिची जाळून हत्या केल्याची कबुली आईने दिली आहे. पण यामध्ये मुलाचा हात नसल्याचं तिचं म्हणणं आहे. पोलिसांनी तरुणीच्या आईला अटक केली असून तिच्या भावाचा शोध सुरु आहे.
समाजात स्वत:ची प्रतिष्ठा जपण्यासाठी गोल्या वर्षात पाकिस्तानमध्ये ८०० महिलांची हत्या झाली होती. या प्रकरणाच्या कसून चौकशीचे आदेश तेथील मुख्यमंत्र्यांनी दिले आहे.