आईनस्टाईनचे शंभर वर्षांपूर्वीचे गुरुत्वाकर्षण लहरी भाकीत खरे
जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ अल्बर्ट आईनस्टाईन यांनी शंभर वर्षांपूर्वी ज्या गुरुत्वाकर्षण लहरींचं भाकीत केलं होतं. त्यांचा शोध लागलाय.
वॉशिंग्टन : जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ अल्बर्ट आईनस्टाईन यांनी शंभर वर्षांपूर्वी ज्या गुरुत्वाकर्षण लहरींचं भाकीत केलं होतं. त्यांचा शोध लागलाय.
अवकाश विज्ञानातील हा सर्वात मोठा शोध मानला जातोय. त्यामुळे ब्रम्हांडाबाबत आता आणखी सखोल माहिती मिळण्यास मदत होईल असं म्हटलं जातंय. या लहरींचा शोध लावण्यामध्ये भारतीय शास्त्रज्ञांनी मोठे योगदान दिले आहे.
अमेरिकेतील लेझर इंटरफेरोमीटर ग्रॅव्हीटेशनल वेव्ह ऑब्झरर्वेटरीच्या म्हणजेच 'लोगो'च्या दोन वेधशाळा आणि इटलीमधील व्हर्गो वेधशाळांनी संयुक्तपणे गुरुत्वीय लहरींची प्रत्यक्ष नोंद घेण्यासाठी प्रयत्न केले होते.
खगोल शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिन्स यांनी हा एक मोठा शोध असल्याचं म्हटलंय तर पंतप्रधान मोदींनी शोध लावण्यात योगदान देणा-या भारतीय चामूचं अभिनंदन केलंय.