सेनेच्या बसवर आत्मघातकी हल्ला, 27 जवान ठार
पश्चिम काबूल भागात दहशतवाद्यांनी पोलिसांवर दहशतवादी हल्ला घडवून आणलाय.
काबूल : पश्चिम काबूल भागात दहशतवाद्यांनी पोलिसांवर दहशतवादी हल्ला घडवून आणलाय.
सेनेच्या जवानांना घेऊन जाणाऱ्या दोन बस या दहशतवाद्यांच्या निशाण्यावर आल्या. या आत्मघातकी हल्ल्यात सेनेचे जवळपास 27 अधिकारी-कर्मचारी ठार झालेत तर 40 जण जखमी झालेत.
गृह मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार, हे बॉम्बस्फोट कशाच्या मदतीनं घडवून आणले गेले यामागची कारणं जाणून घेण्याचा प्रयत्न सुरू आहे.
नुकतंच ट्रेनिंग पूर्ण झालेल्या सेनेच्या जवानांना घेऊन बस वारडकहून काबूलला निघाली होती. दोन बॉम्बस्फोटांचे आवाज ऐकल्याचं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे.
उल्लेखनीय म्हणजे, गेल्या आठवड्यातही तालिबाननं एका पॅसेंजर बसवर हल्ला केला होता. यात 14 जण ठार झाले होते. एप्रिल महिन्यातही काबूलमध्ये सिक्युरिटी सर्व्हिस फॅसिलिटीवर तालिबाननं हल्ला केला होता. यात 64 जण ठार झाले होते.