लंडन : 'जोपर्यंत तंत्रज्ञानाद्वारे खाणं डाऊनलोड करता येणार नाही तोपर्यंत आमचा तंत्रज्ञानावर विश्वास बसणार नाही' या आशयाचा एक विनोद इंटरनेटवर नेहमी वाचायला मिळतो. पण, आता मात्र ही कल्पना सत्यात उतरण्याची शक्यता आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'टाइम्स ऑफ इंडिया' वृत्तपत्रातील एका बातमीनुसार २११६ सालापर्यंत खाणं डाऊनलोड करणं, अकल्पित अशा गगनचुंबी इमारती बांधणं, पाण्याखाली शहरं तयार करणं आणि ३डी माध्यमातून घरांची बांधणी करणं या गोष्टी सत्यात उतरणार आहेत.


सॅमसंग कंपनीच्या मालकीच्या 'स्मार्टथिंग' या कंपनीने स्मार्टथिंग फ्युचर लिव्हिंग रिपोर्ट या नावाचा एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. ही कंपनी भविष्यातील राहणीमानाबद्दल नेहमी कल्पना मांडत असते.


याच अहवालानुसार भविष्यात मानव पाण्याखाली मोठमोठी शहरे तयार करुन त्यात वस्ती करू शकतो. त्याचप्रमाणे आज ज्याप्रमाणे गाड्या वापरतो त्याप्रमाणे भविष्यात दळणवळणासाठी खासगी ड्रोन्सही वापरले जातील असे भाकित या अहवालात केले गेले आहे.


स्मार्टफोन्सची क्रांती आताच दिसत आहे. भविष्यातही हाच स्मार्टफोन मानवी जीवनावर अनेक सकारात्मक परिणाम घडवून आणेलं. मानव त्याचा वापर जीवनाच्या विविध क्षेत्रांत करेल, असेही या अहवालात म्हटले आहे. पण, मानव चंद्रावर आणि मंगळावर कधी वस्ती स्थापन करणार हा प्रश्न मात्र अनुत्तरितच राहिला आहे.