हैदराबाद : निराशेच्या भरात आणखीन एका अभिनेत्यानं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना हैदराबादमध्ये घडलीय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एका तेलगू चॅनलमध्ये काम करणाऱ्या २९ वर्षीय प्रदिप कुमार या अभिनेत्यानं आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केलीय. 


अलकापुरीस्थित कॉलनीतल्या घरी प्रदीपच्या पत्नीनं आणि त्याच्या एका मित्रानं गळफास लावलेल्या अवस्थेत त्याला पाहिलं... तेव्हा दोघांना धक्काच बसला. दोघांनीही प्रदीपला खाली उतरवून तात्काळ हॉस्पीटलकडे धाव घेतली... परंतु, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. 


नरसिंगी पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, प्रदीपच्या आत्महत्येमागचं कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही.