मुंबई : अनेकदा महिला त्यांच्यासोबत झालेल्या चुकीच्या व्यवहारांविरोधात आवाज उठवतांना दिसतात. चुकीचा व्यवहार करणं, छेड काढणे, चुकीच्या पद्धतीने स्पर्श करणं अशा घटनांविरोधात महिला नेहमी आवाज उठवतात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बॉलिवूड अभिनेत्री पंखुडी अवस्थी देखील छेडछाडीची शिकार झाली आहे. एका व्यक्तीने चुकीच्या पद्धतीने तिला स्पर्श केल्याने तिने त्या व्यक्तीला कानाखाली वाजवली. पंखुडी अवस्थी लवकरच आगामी टीव्ही शो 'क्या कसूर है अमला का?'मध्ये दिसणार आहे. पंखुडीने म्हटलं की, 'जर मी माझा अनुभव सांगितला तर मी म्हणेल की भारताच्या सुरक्षित शहरांमध्ये मुंबई एक आहे. मी दिल्ली, चंडीगड, नोएडा आणि बंगळुरु यासह अनेक शहरांमध्ये राहिली आहे. मी हे नाही म्हणणार की शहर महिलांसाठी सुरक्षित असतात. जेव्हा मी दिल्लीत होते तेव्हा मेट्रोने कॉलेजला जायची. अशा अनेक घटना तेव्हा पाहायला मिळायच्या पण मी व्यवस्थित त्या समजू शकत नव्हते. शहरामध्ये रात्री बाहेर पडणे मुलींसाठी सुरक्षित नसते.'


पंखुडीने म्हटलं की, याआधी माझ्यामध्ये याच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी हिम्मत नव्हती. काही दिवसांपूर्वी मी बंगळुरुमध्ये माझ्या मित्रांसोबत होते आणि मी स्कर्ट घातला होता. तेव्हा एका व्यक्तीने माझा पायांना शिवण्याचा प्रयत्न केला आणि मी त्याच्या कानाखाली वाजवली. माझ्या सोबत जर कोणी छेडछाड केली तर मी शांत नाही बसू शकत.