मुंबई : दाक्षिणात्य अभिनेत्री गौतमी हिनं आपलं अभिनेता कमल हसनसोबत असलेलं 13 वर्षांचं नात संपुष्टात आल्याचं जाहीर केलंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'Life and decisions' (आयुष्य आणि निर्णय) अशा मथळ्याखाली एक निवेदन गौतमी तडीमल्ला यांनी दिलंय. यात त्यांनी आयुष्याच्या या टप्प्यावर येऊन आपण कमल हसनसोबतच आपलं नात संपवण्याचा 'क्लेशकारक निर्णय' घेतल्याचं म्हटलंय. 


हे मनाला हादरा देणारं सत्य पचवण्यासाठी आणि या निर्णयापर्यंत येऊन पोहचण्यासाठी आपण काही वर्षांचा कालावधी घेतल्याचंही गौतमी यांनी म्हटलंय. 


<blockquote class="twitter-tweet" data-lang="en"><p lang="en" dir="ltr">Heartbroken to have to share...Life and decisions <a href="https://t.co/HPXPUKwPGA">https://t.co/HPXPUKwPGA</a> via <a href="https://twitter.com/wordpressdotcom">@wordpressdotcom</a></p>&mdash; Gautami (@gautamitads) <a href="https://twitter.com/gautamitads/status/793354571481542656">November 1, 2016</a></blockquote>
<script async src="//platform.twitter.com/widgets.js" charset="utf-8"></script>


उल्लेखनीय म्हणजे, कमल हसन (61 वर्ष) आणि गौतमी (48 वर्ष) यांच्या वयात 13 वर्षांचं आहे... आणि आता त्यांचं 13 वर्षांपासून सुरू असलेलं 'लिव्ह इन' नातं इथंच संपलंय. 


कमल हसन यांच्यासोबत नात्यात येण्याअगोदर गौतमी यांचा व्यावसायिक संदीप भाटिया यांच्यासोबत घटस्फोट झाला होता. गौतमीला आपल्या पतीपासून एक मुलगी आहे. तर कमल हसन यांचं याआधी दोन वेळ विवाह झाला होता. दुसरी पत्नी सारिका हिच्यासोबत श्रुती आणि अक्षरा अशा दोन मुली त्यांना आहेत.