गुलशन कुमार यांच्या भूमिकेत दिसणार अक्षय
बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारने आणखी एका नव्या सिनेमाची घोषणा केली आहे.
मुंबई : बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारने आणखी एका नव्या सिनेमाची घोषणा केली आहे.
'मोगुल' या सिनेमात अक्षय कुमार प्रसिद्ध संगीतकार गुलशन कुमार यांच्या भूमिकेत दिसणार आहे. 'संगिताचे मुगल' गुलशन कुमार यांचा हा बायोपिक असेल.
'माझ्या पहिल्या सिनेमाची सुरुवात गुलशन कुमार यांच्यापासून झाली. ते संगीत सम्राट होते, त्यांची भूमिका निभावण्यास उत्सुक आहे', असं ट्वीट अक्षय कुमारने केलं आहे.
गुलशन कुमार यांची पत्नी सुदेश कुमारी या सिनेमाची निर्मिती करत असून सुभाष कपूर दिग्दर्शन करताय.
हा सिनेमा 2018 मध्ये प्रदर्शित होईल. गुलशन कुमार यांची मुंबईत 1997 साली गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती.