मुंबई : ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन यांनी मुंबईतल्या नर्सी मोंजी कॉलेजच्या एका कार्यक्रमाला हजेरी लावली होती. उमंग फेस्टिव्हलमध्ये जया बच्चन आल्या होत्या. या कार्यक्रमादरम्यान काही विद्यार्थ्यांनी जया बच्चन यांचे फोटो काढायला सुरुवात केली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या विद्यार्थ्यांवर जया बच्चन चांगल्याच भडकल्या. हातात मोबाईल आणि कॅमेरा आहे म्हणजे तुम्ही कोणाचेही, कुठेही फोटो काढू शकत नाही, असं जया बच्चन यांनी या विद्यार्थ्यांना खडसावलं. मी बोलत असताना तुम्ही फोटो काढत आहात, हा बेशिस्तपणा मला आवडलेला नसल्याचं जया बच्चन म्हणाल्या. 


पाहा काय म्हणाल्या जया बच्चन 



तर दुसरीकडे अमिताभ बच्चनही फोटोंवरूनच भडकले आहेत. पिंकविला या इंग्रजी वेबसाईटनं अमिताभ बच्चन यांचे फोटो त्यांच्या वेबसाईटवर छापल्यामुळे बिग बींनी ट्विटरवरून नाराजी व्यक्त केली आहे.