मुंबई : क्रिकेटर विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्या फॅन्ससाठी ही खुशखबर ठरू शकते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या दोन महिन्यांपासून विराट आणि अनुष्काच्या ब्रेकअपच्या निरनिराळ्या बातम्या येत आहेत. डीएनएनं दिलेल्या बातमीनुसार, आता मात्र या दोघांनीही आपले मतभेद बाजुला सारून पुन्हा एकदा एकत्र येण्याचा निर्णय घेतलाय.


अनुष्का ही सध्या सुलतानच्या शुटींगमध्ये व्यस्त आहे... ब्रेकअपनंतर आपल्या कामात तीनं स्वत:ला गुंतवून घेतलं होतं. पण, आता मात्र तिनं विराटला भेटण्याचा निर्णय घेतलाय. यासाठी तिनं सुलतानच्या शुटींगमधून थोडा ब्रेकही घेतलाय. 


नुकतंच, आशिया कपनंतर अनुष्कानं विराटला शुभेच्छा देण्यासाठी फोनही केला होता... आता तिनं, विराटला भेटण्यासाठी सुलतानच्या शुटींगमधून दोन-तीन दिवसांसाठी सुट्टी घेतलीय. 


त्यामुळे, आता चाहत्यांचं हे लाडकं सेलिब्रिटी जोडपं पुन्हा एकत्र येण्याची चिन्हं आहेत.