मुंबई : 'बाहुबली 2 - द कनक्ल्यूजन' प्रदर्शित होण्याआधीच, एक वेगळी बातमी समोर आली आहे. 'बाहुबली'चे कपडे तुमच्या अंगावर दिसू शकतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'बाहुबली 2 द कनक्ल्यूजन'ची फॅन्समध्ये जबरदस्त क्रेझ आहे. मुंबईमध्ये ठेवलेल्या एका फॅशन शोमध्येही ही क्रेझ दिसून आली. बाहुबलीच्या थीमवर आधारित या फॅशन शोचे कॉस्च्युम्सही सिनेमाच्या कॅरेक्टरपासून प्रेरित होते.


बाहुबली आणि कटप्पा या इव्हेंटमध्ये दिसले नाहीत पण सिनेमाची हिरोईन तमन्ना भाटियाने रॅम्पवर आपला जलवा दाखवला. 'बाहुबली 2 द कनक्ल्यूजन'च्या प्रदर्शनाआधी फॅन्स आपल्या आवडत्या कलाकारांचे कॉस्च्युम्स ऑनलाईन ऑर्डर देऊऩही मागवू शकतात. 


एवढचं नाही तर देशातील वेगवेगळ्या भागात 'बाहुबली थिम पार्क' बनवण्याचीही प्लानिंगही सध्या सुरु आहे. २८ एप्रिलला कटप्पाने बाहुबली का मारलं? यावरुन पडदा उठणार आहे. त्यामुळे तोपर्यंत सगळं वातावरण बाहुबलीमय करण्याचा निर्मात्यांचा विचार आहे.