मुंबई : सुल्तानचे दिग्दर्शक अली अब्बास जफर जेव्हा 'गुंडे' हा सिनेमा करत होते तेव्हा 'सुल्तान'च्या स्क्रिप्टवरही काम करत होते. 'गुंडे'मध्ये अर्जुन कपूर होता. अली जफर यांनी अर्जुनला 'सुल्तान' सिनेमाबाबत सांगितलं होतं आणि त्याला या सिनेमासाठी ऑफर केली होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अर्जुन कपूरला मात्र या सिनेमाच्या स्क्रीप्टमध्ये काही खास वाटली नाही. कुस्तीवर आधारित हा सिनेमा त्याला पसंत नाही आला म्हणून त्याने हा सिनेमा नाकारला.


अर्जुन कपूरनंतर हा सिनेमा सलमानला ऑफर करण्यात आला. या सिनेमावर विचार केल्यानंतर सलमानने या सिनेमाला होकार दिला. ईदच्या दिवशी हा सिनेमा रिलीज झाला आणि पहिल्या 5 दिवसातच सिनेमाने चांगली कामगिरी केली. अर्जुनला या सिनेमाबाबत काय वाटतं ते माहित नाही पण सलमानमुळे हा सिनेमा हिट झाला की स्क्रिटमुळे हे तर प्रेक्षकच सांगू शकतील. पण अर्जुन कपूरचं म्हणणं आहे की, ही गोष्ट सत्य नाही. त्याला सुल्तानसाठी ऑफरच नव्हती.