भारती सिंहला रुग्णालयातून डिस्चार्ज
आपल्या कॉमेडीने प्रेक्षकांना खळखळून हसवणारी भारती सिंहच्या चाहत्यांसाठी खुशखबर आहे. गेल्या काही दिवसांपासून भारती रुग्णालयात उपचार घेत होती.
मुंबई : आपल्या कॉमेडीने प्रेक्षकांना खळखळून हसवणारी भारती सिंहच्या चाहत्यांसाठी खुशखबर आहे. गेल्या काही दिवसांपासून भारती रुग्णालयात उपचार घेत होती.
तिच्या छातीत दुखू लागल्याने तिच्यावर उपचार सुरु होते. आता उपचारानंतर तिला रुग्णालयातून घरी सोडण्यात आलेय.
भारतीने रुग्णालयातून बाहेर पडल्यानंतर काही सेल्फी इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेत. हे फोटो पोस्ट करतानाच तिने चाहत्यांनी दिलेल्या प्रेमाबद्दल आभारही मानलेत.
गेल्या काही दिवसांपासून भारती घरातील कार्यक्रम तसेच लग्न समारंभामध्ये व्यस्त होती. त्यामुळेच तिला थकवा आला होता. त्यामुळे काही काळ आराम करुन लवकरच ती शोमध्ये परतणार आहे.
भारती सिंह सध्या कलर्स वाहिनीवरील 'कॉमेडी नाईट्स बचाओ' या शोमध्ये काम करतेय.