मुंबई : 'ऐ दिल है मुश्किल' या बहुचर्चित सिनेमातलं पहिलं गाणं प्रेक्षकांसमोर आलंय... या गाण्यात पुन्हा एकदा ऐश्वर्या राय बच्चन प्रेक्षकांचं मन जिंकण्यात यशस्वी झालीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

करण जोहर दिग्दर्शित हा सिनेमा रोमान्स आणि नातेसंबंधांवर आधारित आहे. रणबीर कपूर, ऐश्वर्या राय बच्चन, अनुष्का शर्मा आणि फवाद खान अशी तगडी स्टारकास्ट या सिनेमात दिसतेय. 


'बुलेया' हे गाणं पाहिल्यानंतर रणबीर आणि अनुष्कापेक्षा ऐश्वर्या जास्तच भाव खावून जातेय का? असा साहजिकच प्रश्न प्रेक्षकांना पडेल, हे नक्की.... 


दिवाळीच्या मुहूर्तावर हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.