मुंबई : ‘चूकभूल द्यावी घ्यावी’ ही कथा राजाभाऊ आणि मालती या वयोवृद्ध दाम्पत्याची आहे. वय झालं असलं तरी या जोडीतील प्रेम आज वयाच्या ऐंशीव्या वर्षीही कायम आहे. जसं प्रेम आहे तसंच या नात्यात एक खट्याळपणासुद्धा आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या वयातही राजाभाऊ मनाने अगदी तरुण आहेत आणि या मुद्यावरुन दोघांमध्ये प्रेमळ खटकेही उडतच असतात. राजाभाऊंचा हट्ट की मालतीने त्यांना तरुण म्हणावं आणि मालतीची इच्छा अशी की राजाभाऊंनी हा अट्टाहास सोडावा. या दोघांच्या याच खुसखुशीत नात्याची गंमत या मालिकेतून बघायला मिळणार आहे.   


सुप्रसिद्ध अभिनेत्री मनवा नाईक आणि सुशांत तुंगारे या मालिकेची निर्मिती करणार असून त्याचे दिग्दर्शन स्वप्ननील जयकर करणार आहे तर पटकथा आणि संवाद मधुगंधा कुलकर्णीचे असतील. यानिमित्ताने दिलीप प्रभावळकर आणि सुकन्या मोने जोडी म्हणून प्रथमच एकत्र येणार आहेत त्यामुळे मनोरंजनासोबतच दर्जेदार अभिनयाची जुगलबंदीही या मालिकेतून बघायला मिळेल. 


वयवर्षे १०३ असणारी राजाभाऊंच्या आईची भूमिका नयना आपटे साकारत असून तरुणपणीच्या राजाभाऊच्या भूमिकेत हरहुन्नरी अभिनेता प्रियदर्शन जाधव आणि मालतीच्या भूमिकेत स्नेहा फाटक ही अभिनेत्री बघायला मिळणार आहे.