डीडीएलजेमधील काजोलची छोटी बहीण आता कशी दिसतेय पाहा
तुम्हाला दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे या चित्रपटातील काजोलची लहान बहीण आठवते का? हो आपण बोलत आहोत त्या छोट्याश्या पुजा रुपारेलबद्दल.
मुंबई : तुम्हाला दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे या चित्रपटातील काजोलची लहान बहीण आठवते का? हो आपण बोलत आहोत त्या छोट्याश्या पुजा रुपारेलबद्दल.
मात्र ही छोटीशी क्यूट गर्ल आता लहान राहिलेली नाही. जॅकी श्रॉफच्या किंग अंकलमध्ये ती पहिल्यांदा रुपेरी पडद्यावर दिसली होती.
त्यानंतर डीडीएलजेमधील चुटकीच्या भूमिकेत तिने प्रेक्षकांची मने जिंकून घेतली. पुजा रुपारेल नुकतीच अनिल कपूर यांच्या टीव्ही सीरियलमध्ये दिसली होती.
दरम्यान, बॉलीवूडमध्ये पुन्हा एकदा येण्यास ती सज्ज झालीये. लवकरच ती चित्रपटात दिसेल अशी आशा आहे.