मुंबई : सुल्तान या चित्रपटासाठी अनुष्का शर्माची लीड रोल म्हणून निवड झाल्यानंतर प्रेक्षकांना सलमान आणि अनुष्काची जोडी कशी दिसते याबाबत चाहत्यांना उत्सुकता होती. अखेर ही उत्सुकता संपुष्टात आलीये. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या जोडीचा फर्स्ट लूक समोर आलाय. या चित्रपटात ही जोडी रेसलिंग करण्यासोबतच मोठ्या पडद्यावर रोमान्सही करणार आहे. या चित्रपटात सलमान सुल्तानची भूमिका करणार आहे. कुस्तीवर आधारित अशी या चित्रपटाची कहाणी आहे. 


पहिल्यांदाच हे दोघे एकत्र या चित्रपटात काम करत आहेत. त्यामुळे यंदाच्या वर्षात ही नवी जोडी बॉलीवूडमध्ये काय कमाल करते ते पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.