नवी दिल्ली : इंस्टाग्रामवर वायरल झालेल्या एका व्हिडीओमध्ये अभिनेत्री माहिरा खान रणबीर कपूरसमोर हात जोडताना दिसतेय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नुकतेच हे दोघं दुबईला एका अॅवार्ड शोमध्ये एकमेकांना भेटले. तिकडे दोघं बराच वेळ एकमेकांशी बोलत होते. त्यांनी एकत्र फोटोजही काढले.


याचदरम्यानच्या फॅन्सकडून पोस्ट झालेल्या एका व्हिडीओमध्ये हे दोघं एका कोपऱ्यात समोरासमोर उभे राहिलेले दिसतायत आणि त्यात माहिरा रणबीरसमोर हात जोडताना दिसतेय.


सोशल मीडियावर हा व्हिडीओ वायरल होतोय. माहिरा आणि रणबीर यांच्यात नेमंक काय घडलं तसेच ती रणबीरची का माफी मागतेय याबाबत चाहत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कुतूहल आहे.