जितेंद्र जोशीचे नाट्यरसिकांना कडक `दोन स्पेशल`
पाऊस असूनही प्रयोग जवळ पास हाऊस फुल्ल....नाटक संपल्यानंतर पडदा पडतो...
बहुतेक लहान मुलेच हुशार झाली तर काही तरी होईल या महाराष्ट्राचे !
----------
दिनेश दुखंडे, झी २४ तास, मुंबई :
स्थळ : दादर,शिवाजी मन्दिर
प्रसंग : नाटक, दोन स्पेशल
प्रयोग : रविवार, रात्री 8 वाजता
पाऊस असूनही प्रयोग जवळ पास हाऊस फुल्ल....नाटक संपल्यानंतर पडदा पडतो...प्रेक्षक उभे राहून टाळ्या वाजवत कलाकरांच्या अभिनयाला मनापासून दाद देतात...प्रेक्षकांच्या मनावर 'दोन स्पेशल'ची धुंदी अजून कायम असते... त्याच धुंदीत ते घरी जाण्यासाठी रंगमंचाकडे पाठ करतात, तोच नाटकातला मुख्य अभिनेता जितेंद्र जोशी पडदा किंचितसा बाजुला सारुन बाहेर येतो आणि प्रेक्षकांशी संवाद साधू लागतो....
त्याच्या संवादात नम्र स्वरात नाराजी व्यक्त होत असते...सगळ्यात आधी तो इतक्या पावसातही नाटकाच्या प्रयोगाला आवर्जून आलेल्या प्रेक्षकांना सैल्यूट ठोकतो...प्रेक्षकांना ते आपले कौतुक वाटते म्हणून तिथे टाळ्या पडतात...पण त्या प्रसंगातच जितेंद्र जोशी मूळ विषयाला हात घालतो...
104 ताप असतानाही मी प्रयोग केला ही माहिती तो देतो....पण प्रेक्षकांमधे कुणाकड़े तरी असलेल्या लहान मुलाच्या आवाजा मुळे अभिनयात येत असलेल्या व्यत्ययावर जितेंद्रच्या मुखातून नाराजी व्यक्त होत असते. 'प्रयोगा दरम्यान जर लहान मूल आवाज करीत असेल तर त्याला नाट्यगृहा बाहेर नेण्याइतकेही सौजन्य आपल्यामधे नाही...मला मध्यांतरामधे गिरिजा म्हणाली की लिंक तूटतेय रे, प्रयोग पुढे कसा न्यायचा आपण ?'
प्रेक्षकांना काही वाटत नसेल तर आम्ही तुमच्यात येऊन त्या लहान मुलाला गप्प करावे अशी अपेक्षा होती का ? तळमळीच्या स्वरात जीतेन्द्र बोलत होता...जर वयाने मोठ्या झालेल्या प्रेक्षकांना काही कळत नसेल, तर बहुतेक लहान मुलेच हुशार झाली तर काही तरी होएल या महाराष्ट्राचे अशा उद्विग्न भावनेन् तो आपला संवाद आटोपता घेतो आणि सारुन बाहेर आलेल्या पडद्यामागे अदृश्य होतो.....
साधारण दीड ते दोन मिनिटाच्या या प्रसंगात नाट्यगृहात टाचनी पडावी इतकी शांतता पसरली होती... प्रेक्षक आपआपसत कुजबुजत नाट्यगृहाबाहेर पडत होते... काहीजण जितेंद्र जोशीने व्यक्त केलेल्या भावनेशी सहमत होते, तर काहीना तो स्टंट वाटला...अभिनयात व्यत्यय इतका त्या लहान मुलाने दंगा केला केला का ? अशा स्वरात काही प्रेक्षक एकमेकांकडे जितेंद्र जोशीच्या पवित्र्यावर आश्चर्य व्यक्त करीत होते....
नाटकाचा प्रयोग सुरु होण्या आधी प्रेक्षकांना आवर्जून सुचना केली जाते की आपल्या कड़े असलेले मोबाइल फोन बंद करावेत किंवा साइलेंट मोड़ वर टाकावेत.... 'दोन स्पेशल'च्या प्रयोगाआधीही दोन सुचना केली गेल्या...पहिली सुचना आपल्याकडे असलेले मोबाइल फोन बंद करावेत आणि दूसरी सुचना की पहिल्या सुचनेच कृपया पालन करावे...दूसरी सुचना ऐकल्या नंतर नाट्यगृहात खसखस पिकली...मात्र प्रेक्षकांच्या नशिबि प्रयोगाचा शेवट काही वेगळाच वाढून ठेवला होता..
----------------
'दोन स्पेशल' नाटकाच्या जाहिरातीत 12 वर्षाखालील मुलांना सक्त मनाई अशी सुचना देण्यात आली आहे. ( नाटकात मद्यपान आणि धूम्रपानाचा एक प्रसंग असल्यामुळे अशी सूचना करण्यात आली असावी )