मुंबई : अभिनेता गोविंदा ९०च्या दशकात बॉलीवूडमध्ये सुपरस्टार होता. त्याचे अनेक चित्रपट हिटही झाले. तुम्ही जर गोविंदाचा सुपरहिट चित्रपट आंखे पाहिला असेल तर त्यातील ओ लाल दुपट्टे वाली हे गाण नक्की आठवलं असेल. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

डेविड धवन यांच्या आंखे या चित्रपटातून रितू या अभिनेत्रीने बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर त्यांनी हम सब चोर हैं, ‘आर या पार’, ‘काला साम्राज्य’, ‘हद कर दी आपने’, ‘लज्जा’, ‘शक्ति’,‘ऐलान’ और दुबई रिटर्न या चित्रपटात काम केले. मात्र यानंतर त्यांनी बॉलीवूडला अलविदा केला. रितूने बिझनेसमन हरी वेंकट यांच्याशी लग्न केले. त्यांना दोन मुलेही आहेत. 


बॉलीवूडला बाय बाय करणारी ही अभिनेत्री आता पूर्णपणे बदललीये. नुकतीच रितूने इन्स्टाग्रामवर काही फोटो पोस्ट केलेत. यात ती हॉट लूकमध्ये दिसतेय.