निम्रत कौरचा बिकिनीतला बोल्ड अवतार...
`लंच बॉक्स`फेम अभिनेत्री निम्रत कौरनं आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोंमुळे अनेकांना धक्का बसलाय.
नवी दिल्ली : 'लंच बॉक्स'फेम अभिनेत्री निम्रत कौरनं आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोंमुळे अनेकांना धक्का बसलाय.
या फोटोंमध्ये बोल्ड निम्रत आणखीन खुलून दिसतेय. एका बीचवर बिकिनीवर निम्रत पोहण्याचा आनंद घेताना दिसतेय.
कॅनडाच्या बर्फाळ चोकमुस लेकजवळचे हे फोटो आहेत. हा आपल्या आयुष्यातला सर्वात 'क्रेझी' दिवस असल्याचं निम्रतनं म्हटलंय.
'लंच बॉक्स'नंतर निम्रत 'एअरलिफ्ट'मध्येही दिसली होती. निम्रत सध्या कॅनडामध्ये टीव्ही सीरिज wayward pines शुटींगमध्ये व्यस्त आहे. शुटिंगनंनतर कॅनडामध्ये अॅडव्हेंचर ट्रिपची मजा घेतेय.