मुंबई : हृतिक रोशन आणि कंगना राणावत गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेला वॉर जगजाहीर आहे.. हृतिक आणि कंगना दोघंही एकमेकांवर वाटेल तसे आरोप करत सुटले आहेत.. आता तर ह्रतिक-कंगनाचा पर्सनल फोटो सोशल साईटवर आला असून कंगनाच्या वकिलाने ह्रतिकला हा फोटो फेक ठरविण्याचं चॅलेंज केलं आहे...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

.


हा लिक झालेला फोटो ह्रतिक आणि कंगना कपल असल्याचं दर्शवतो आहे... क्रिश ३च्या सेटवरील हा फोटो असल्याचं बोललं जातं आहे.. ह्रतिक आणि त्याच्या टीमने कंगना बरोबर कुठलेही संबंध नसल्याचा दावा केला होता.. 


या दोघांमध्ये फक्त प्रोफेशनल संबंध असल्याचा दावा ह्रतिकच्या वकिलांनी केला होता.. मात्र या लिक झालेल्या फोटोमध्ये ह्रतिक आणि कंगनामध्ये संबंध असल्याचं दिसतये.. त्यामुळे आता ह्रतिक आणि कंगनाचा हा वाद आता कोणतं वळण घेतो तसचं ह्रतिक या फोटोवर काय प्रतिक्रिया देतो हे बघणं उत्सुकतेचं ठरणार आहे..