त्या आक्षेपार्ह जाहिरातीबाबत रणवीरची दिलगिरी
जाहिरातीच्या पोस्टरमध्ये महिलांबाबत आक्षेपार्ह मजकूर असल्यामुळे अभिनेता रणवीर सिंगवर जोरदार टीका होत होती.
मुंबई : जाहिरातीच्या पोस्टरमध्ये महिलांबाबत आक्षेपार्ह मजकूर असल्यामुळे अभिनेता रणवीर सिंगवर जोरदार टीका होत होती. या जाहिरातीप्रकरणी रणवीर सिंगनं दिलगिरी व्यक्त केली आहे. पोस्टरवर चुकीचा मजकूर छापण्यात आला. महिलांबद्दल मला आदर असल्याचंही रणवीर म्हणाला आहे.
जॅक अॅण्ड जोन्सच्या जाहिरातीच्या पोस्टरमध्ये रणवीर सिंग महिलेला खांद्यावर उचलून घेऊन जाताना दिसत आहे. या पोस्टरमध्ये डोण्ट होल्ड बॅक, टेक यूअर वर्क होम, असा आक्षेपार्ह मजकूर छापण्यात आला होता. या पोस्टरमुळे रणवीर आणि जॅक अॅण्ड जोन्सवर मोठ्याप्रमाणावर टीका सुरु होती.