मुंबई : सारा अली खान बॉलिवूड पदार्पण करणार आहे. सारा ही अभिनेता सैफ अली खानची मुलगी आहे. जिनियस अनिल शर्मा यांच्या सिनेमातून  सारा बॉलिवूडमध्ये एंट्री करणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनिल शर्माच्या या सिनेमातून उत्कर्ष आणि सारा दोघेही बॉलिवूड पदार्पण करणार आहेत.


अभिनेता अनिल शर्मा यांचा मुलगा आणि सनी देओलच्या 'गदर' या सिनेमातील चिमुकला उत्कर्ष या सिनेमाचा अभिनेता असणार आहे. 


 साराची एंट्री जवळपास निश्चित झाली असल्याची चर्चा आहे. यापूर्वी सारा करण जोहरच्या ‘स्टूडेंट ऑफ दी इयर’मधून पदार्पण करणार असल्याची चर्चा होती.


अमृता सिंगला काही अटी मान्य न झाल्याने साराचं बॉलिवूड पदार्पण पुढे ढकललं. साराची आई आणि सैफची पहिली पत्नी अमृता सिंगने सिनेमाविषयी अनिल शर्मांशी चर्चा केल्याचं बोललं जातंय.