मुंबई : सलमान खानच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर सलमानच्या वडिलांना सलमानच्या पाठीमागे बचावासाठी उभं रहावं लागतंय, सलमानच्या वादग्रस्त वक्तव्यावर सलीम खान यांनी माफी मागितली आहे, सलमान बोलला ते चुकीचे होते, मात्र त्याचा बोलण्यामागचा उद्देश चुकीचा नव्हता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सलमान खानने असं उदाहरण द्यायला नको होतं, त्याच्यावतीने मी माफी मागतो, चुकीला माफी करण्यासारखं दुसरं कोणतं पुण्य नसल्याचंही सलीम खान यांनी म्हटलं आहे.


सुल्तान सिनेमाची शुटिंग झाल्यानंतर मला बलात्कार पीडीत महिलेसारखं वाटत होतं, असं वादग्रस्त वक्तव्य सलमान खानने केलं आहे.


सलमान खानने एका मुलाखतीत म्हटलं आहे, मी जेव्हा सुल्तानच्या शुटिंगनंतर आखाड्यातून बाहेर यायचो तेव्हा माझी परिस्थित बलात्कार झालेल्या महिलेप्रमाणे होते, मी सरळ चालू शकत नाही, असं सलमान खानने म्हटलं होतं.महिला आयोगाने याविषयी सलमान खानकडे आठ दिवसाच्या आत उत्तर मागितलं आहे.