मुंबई : सलमान खान आणि कतरिना कैफ पुन्हा एकदा एकत्र येणार अशा चर्चा आहेत. सलमान खान कतरिनासाठी एक चित्रपट निर्मिती करेल, असं बोललं जात आहे. हा चित्रपट कोणता असेल याची मात्र अद्याप माहिती मिळू शकलेली नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कतरिनाचा नुकताच 'फितूर' सिनेमा प्रदर्शित झाला होता. त्याच्या आधी तिचा 'फँटम'सुद्धा येऊन गेला. पण, हे दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमाल करू शकले नाहीत. सलमान किंवा कतरिना यांच्यापैकी कोणीही या नव्या चित्रपटाविषयी काही खुलासा केला नसला तरी असे झाल्यास सलमान कतरिनासाठी पुन्हा एकदा गॉड फादर ठरेल यात शंका नाही.


दबंग खान सलमान आणि कतरिना कैफ यांच्यातील अफेअरच्या चर्चा फारच रंगल्या होत्या. त्यांच्यातील ब्रेकअपनंतर कतरिना आणि रणबीर कपूर जवळपास एक वर्ष एकत्र होते. जानेवारीत हे दोघे एकमेकांपासून वेगळे झाले. पण, तेव्हाही कतरिना सलमानला जाऊन भेटली होती.