`होणार सून मी` चा श्री ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर
झी मराठी वाहिनीवरील होणार सून मी या घरची या मालिकेतील श्री अर्थात शशांक केतकर सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे.
मुंबई : झी मराठी वाहिनीवरील होणार सून मी या घरची या मालिकेतील श्री अर्थात शशांक केतकर सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे.
काही महिन्यांपूर्वीच होणार सून मीने प्रेक्षकांचा निरोप घेतला. मात्र त्यानंतर आता शशांक त्याच्या गोष्ट तशी गमतीची या नाटकात व्यस्त आहे. त्याचसाठी तो ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेलाय.
तिथचे काही फोटो त्याने आपल्या ट्विटरवरुन शेअर केलेत. मालिका, नाटक त्यानंतर आता शशांक लवकरच एका चित्रपटातही दिसणार आहे. त्याचा टीझर त्याने नुकताच ट्विटरवर पोस्ट केलाय.