मुंबई: बॉलीवूड अभिनेत्री प्रीती झिंटा पाठोपाठ आता उर्मिला मातोंडकरनंही लग्न केलं आहे. काश्मिरमधला बिझनेसमन आणि मॉडेल मोहसिन अख्तर मीर याच्याबरोबर उर्मिला विवाह बंधनात अडकली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चकाचक आणि बॉलीवूड सेलिब्रिटींची मांदियाळी टाळून उर्मिलानं अतंत्य साध्या पद्धतीनं लग्न केलं. या लग्न सोहळ्याला बॉलीवूडमधून फक्त मनिष मल्होत्राच उपस्थित होता.


आमच्या दोघांच्या कुटुंबांना हा लग्न सोहळा अगदी साधा ठेवायचा होता, त्यामुळे आम्ही कोणताही झगमगाट न करता फक्त नातेवाईकांनाच लग्नाला बोलावलं, अशी प्रतिक्रिया उर्मिला मातोंडकरनं दिली आहे.