नाशिक : नाशिक जिल्ह्यात विसर्जनावेळी ६ जणांचा मृत्यू झाला. तर नांदेडमध्ये एकाचा मृत्यू झाला. नाशिक जिल्ह्यात घडलेल्या वेगवेगळ्या घटनांमध्ये सिन्नरमध्ये दोन जण बुडाले, तर घरी आलेल्या आसामच्या जवानांचा मृत्यू झाल्याची घटना घडली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संदीप शिरसाठ असे या आसाम रायफल्सचा जवानाचं नाव असून एका बुडणाऱ्या युवकाला वाचविताना शिरसाठ यांचा बुडून मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती येत आहे. पिंपळदमध्ये एकाचा, मालेगावमध्ये एकाचा तर त्र्यंबकेश्वरमध्ये एकाचा बुडून मृत्यू झाला.


नांदेड आणि अकोलामध्ये एकाचा मृत्यू


गणपती विसर्जन करताना एकाचा गोदावरी नदी पात्रात बुडून मृत्यू झाला आहे.  कुंडलवाडी नगर परिषेदेचा कर्मचारी विजय वाघमारे यांचा बूडून मृत्यू झालीची माहिती समोर आली आहे.


गणपती विसर्जनासाठी कर्तव्यावर असताना झाला बूडून मृत्यू झाला आहे. बिलोली तालुक्यातील कुंडलवाडी येथील दुर्देवी घटना घडली आहे. तर अकोला येथेही एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.


नाशिक जिल्ह्यातील मृत्यू झालेल्यांची नावे - 


सिन्नर - रामेश्वर शिवाजी शिरसाठ, वय ३१ आणि संदीप अण्णा शिरसाठ वय २५ वर्ष


त्र्यंबकेश्वर - भूषण हरी कसबे, वय १७ वर्ष


दाभाडी - सुमित कांतिलाल पवार, वय १४ वर्ष


पिंपळद - अमोल साहेबराव पाटील


गंगापूर - रोशन रतन साळवे