मुंबई : अभिनेता भरत जाधव यांचे वडील गणपत हरीभाऊ जाधव (८८) यांचे हृद्यविकाराच्या झटक्याने काल कोल्हापूर येथे निधन झाले आहे. त्यांच्यावर आज अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भरत जाधव यांचे कोल्हापुरातील साने गुरुजी वसाहतीमध्ये घर आहे.  पत्नी शांता आणि पुतण्यासह ते कोल्हापूरमध्ये राहत होते. त्यांच्या वडील गणपत जाधव यांना शुक्रवारी संध्याकाळी ६.४५ वाजण्याच्या सुमारास हृद्यविकाराचा झटका आला. निधनाचे वृत्त समजताच बहीण छाया कोल्हापूरला पोहोचल्यात.


भरत यांचे वडील टॅक्सीचालक होते. अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत त्यांनी मुलांचा सांभाळ केला. ते व्ही. शांताराम यांच्या गाडीचे चालकही होते.