नवी मुंबई : नवी मुंबई महापालिका आयुक्त तुकाराम मुंडेंविरोधात सगळेच पक्ष एकवटले आहेत. सोमवारी या पक्षांनी नवी मुंबई बंदची हाक दिली आहे. नवी मुंबई महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी अनधिकृत अतिक्रमण केलेल्यावर कारवाईचा बडगा उगारला. यात व्यापारी वर्ग, आधीच मुंढे यांच्या विरोधात होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तुकाराम मुंढे यांनी प्रकल्पग्रस्तांच्या गावठाण आणि गावठाण विस्तारातील अनधिकृत घरांना तोडण्याच्या नोटीसा दिल्या, त्यामुळे यावर कारवाई करण्यात येणार आहे. याविरोधात सर्व पक्षीय बैठक झाली यात सोमवारी नवी मुंबई बंदची हाक दिली आहे.


आपण कायद्यानुसार काम करतोय, 2013 नंतरच्या अनधिकृत घरांवर कारवाई करत असून नवी मुंबई  बंद ही प्रत्येकाची खाजगी बाब असून, ठरल्या प्रमाणे कारवाई होणार असल्याचं तुकारम मुंडेंनी म्हटलं आहे.ऐन अधिवेशनाच्या तोंडावर हे आंदोलन होणार असून, याचे तीव्र पडसाद उमटण्याची शक्यता आहे.