मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दत्तक घेतलेल्या नागपूरमधल्या फेटरी गावाला त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी भेट दिली. हिंगणा विधान सभा मतदार संघातल्या या गावात काय प्रश्न आहेत, कुठल्या सोई ग्रामस्थांना हव्या आहेत, यासंदर्भात ग्रामस्थांची मतं जाणून घेतली. या गावाच्या विकासासाठी आपण नियमितपणे फेटरीला भेट देणार असल्याचं अमृता फडणवीस यांनी सांगितलं.