पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकांसाठी भाजपनं जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. पालकमंत्री गिरीश बापट यांच्याहस्ते हा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे. या जाहीरनाम्यात आश्वासनांचा पाऊस पाडण्यात आला आहे.


असा आहे भाजपचा पिंपरी चिंचवडचा जाहीरनामा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

1 सर्वांसाठी आरोग्य आणि 3 लाखांपर्यंत मोफत आरोग्य विमा


2 शहरात वाय फाय सुविधा


3 इस्त्राईल च्या धर्तीवर शाळा उभारणे


4 सरकारी अभियांत्रिकी वैद्यकीय आणि नामांकित महाविद्यालये सुरु करणे


5 रस्त्यांचे सुयोग्य नियोजन करून महत्वाचे चौक सिग्नल फ्री करणार  


6 हिंजेवाडी IT पार्क कडे जाणारी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करणार, हिंजेवाडी ते चाकण मेट्रो सुरु करणार


7 शहरातील सर्व ठिकाणी पुरेसा पाणी पुरवठा, ट्याकर मुक्त शहर करणार


8 अनधिकृत बांधकामे प्रश्न सोडवणारे


9 मिळकत कर कार्पेट एरिया नुसार आकारणार


10 प्राधिकारणातील घरे फ्री होल्ड करणे


11 पंतप्रधान आवास योजनेमार्फत झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन, आर्थिक दुर्बल घटकांसाठी आरक्षित भूखंड विकसित करणे


12 शहरासाठी स्वतंत्र पोलीस मुख्यालय, सर्वत्र सी सी टी व्ही बसवणे      


13 शासकीय कार्यालये आणि त्यांचे उपकार्यालये शहरात सुरु करणे


14 शहरात सार्वजणिक स्वच्छतागृह उभारणे


15 शहरात जास्ती जास्त क्रीडांगणे, उद्याने विकसित करणे, खेळाडू घडवणे