सेल्फी बेतला जीवावर
धुळे जिल्ह्यातल्या लळींग धबधब्याजवळ सेल्फी काढताना तरुणाचा मृत्यू झाला आहे.
धुळे : धुळे जिल्ह्यातल्या लळींग धबधब्याजवळ सेल्फी काढताना तरुणाचा मृत्यू झाला आहे. सेल्फी काढायला जाताना पाय निसटल्यानं या तरुणाला जीव गमवावा लागला. रितेश सोनार असं या तरुणाचं नाव आहे.
रितेश सोनार थेट धबधब्याच्या पाण्यात गेला. तिथेच बुडून त्याचा मृत्यू झाला. 22 वर्षाच्या रितेशनं प्राण गमावल्यानं जुन्या धुळ्यात शोककळा पसरली आहे.