पुण्यातली सभा रद्द झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांना सोशल नेटवर्किंगवर चिमटे
पुणे महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी मुख्यमंत्र्यांची बोलावलेली सभा रद्द करण्याची नामुष्की भाजपवर आली.
पुणे : पुणे महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी मुख्यमंत्र्यांची बोलावलेली सभा रद्द करण्याची नामुष्की भाजपवर आली. टिळक रोडवर आयोजीत या सभेला गर्दी झाली नसल्याने 30 मिनिटे वाट पाहून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माघारी परतावे लागले. पुण्यातली सभा रद्द झाल्यामुळे सोशल नेटवर्किंगवर मात्र भाजप आणि मुख्यमंत्र्यांना खास पुणेरी शैलीमध्ये चिमटे काढण्यात आले.
- दुपारी 1 ते 4 पुणेकर झोपतात. मुख्यमंत्री काय बाजीराव आले असते तरी सभा रद्दच करावी लागली असती
- खुप गर्दी होती पण पार्दर्शकतेमुळे ती दिसत नाही आहे अध्यक्ष महोदय
- अब की बार कुणाचेही सरकार, इथे दुपारी झोपतो मतदार
- ना नरेंद्र ना देवेंद्र श्रेष्ठ... सदाशिव पेठेत दुपारी 2 ते 4 वामकुक्षीच श्रेष्ठ