पुणे : मुंबई-पुणेकर प्रवाशांची दैनंदीनी प्रवासाची सोबती डेक्कन क्वीन आज 87 वर्षांची झालीय. मुंबई-पुणेकर प्रवाशांसाठी ही ट्रेन फार हक्काची आणि जिव्हाळ्याची आहे. गेली 87 वर्षं तिचा मुंबई-पुणे हा प्रवास सुरू आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तिच्या 87 व्या वाढदिवसानिमित्त प्रवाशांमध्ये उत्साह होता.  प्रवाशांनी केक कापून डेक्कन क्वीनचा वाढदिवस साजरा केला आणि वाढदिवसानिमित्त या दख्खनच्या राणीला सजवण्यातही आले होतं.