पुणे : विद्यापीठात काल संध्याकाळी अभाविप आणि एस.एफ.आय. या दोन विद्यार्थी संघटनांमध्ये हाणामारी झाली. याप्रकरणी 9 जणांना अटक करण्यात आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दोन्ही बाजूंकडून चतुश्रृंगी पोलिसांमध्ये तक्रार करण्यात आल्यानंतर गुन्हा दाखल झाला असून 9 कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली. दिल्लीमधल्या रामजस कॉलेजमध्ये जेएनयूचा वादग्रस्त विद्यार्थी उमर खालीदला बोलावण्यास अभाविपनं विरोध केला आहे. याच्याच निषेधार्थ पुण्याच्या सावित्रीबाई फुले विद्यापीठातही काल अभाविपनं निदर्शनं केली. त्यानंतर संध्याकाळी एस.एफ.आय. चे कार्यकर्ते अभाविपच्या निषेधाची पोस्टर्स लावत असताना ही हाणामारी झाल्याचं समजतंय.


तर सोलापूरच्या विद्यार्थ्यांना विनोद तावडेंनी दिलेली कथित धमकी, सोलापूरचे आमदार सुधाकर परिचारक यांचं जवानांचा अवमान करणारं विधान याचा निषेध करण्यासाठी उद्या एस.एफ.आय. आंदोलन करणार आहे. त्याची तयारी म्हणून पोस्टर लावली जात असताना अचानक अभाविपच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याचा आरोप एस.एफ.आय.नं केलाय.