मुंबई : पाणी वाचवण्याची उपाययोजना व उपलब्ध पाणी साठ्याचा सुयोग्य वापर करून पुणेकरांनाआता दिवसातून दोन वेळेला पाणी मिळणार आहे. या निर्णयामुळे पुणेकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पालकमंत्री गिरीश बापट यांच्या अध्यक्षतेखाली आज मुंबई येथे कालवा समितीच्या बैठक झाली. या बैठकीत ही महत्वपूर्णघोषणा पालकमंत्री गिरीश बापट यांनी केली. खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, आमदार राहुल कुल, शरद रणपिसे, सुरेश गोऱ्हे, पाटबंधारे विभागाचे अधिकारी प्रवीण मुंढे, अतुल कपोते आदी पदाधिकारी याबैठकीला उपस्थित होते.


पुणे शहराला पाणीपुरवठा करणार्‍या चारही धरणांत सध्या पावणे २१टीएमसी पाणीसाठा आहे. पुणे शहराला सध्या रोज एक वेळ पाणी दिले जाते. दुष्काळाचे संकट दूर होऊन यंदा पावसाने दमदार हजेरी लावली आहे. त्यामुळे धरणांत  जवळजवळ १00 टक्के पाणीसाठा झाला आहे. या अनुषंगाने, पुणे शहराची सध्याची १३५0 एमएलडी पाण्याचीमागणी पूर्ण करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे, अशी माहिती बापट यांनी दिली.


 मूळ प्रकल्प अहवालानुसार, शहराला ५ टीएमसी पाणी देणे बंधनकारक होते, या बैठकीनंतर पुण्याला ११. ६० टीएमसी इतका पाणी पुरवठा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. पुणेकरांच्या वाढत्या गरजेचा विचार करून पाण्याचे समान वाटप आणि पुर्नवापर करण्यासाठी हा निर्णय बैठकीत घेण्यात आला, असल्याचे बापट यांनी सांगितले.