ठाणे : ठाणे हत्यांकाडप्रकरणात कुटुंबातील १४ जणांची निर्घुण हत्या करणारा हसनेन वारेकर सोशल मीडियावर अधिक अॅक्टिव्ह नव्हता. मात्र त्याचा गुगल प्लसवरील मेसेज त्यांच्या मानसिक स्थितीच्या दिशेने इशारा करणारा आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

"I don't understand how I can care this much when you don't care at all,"असा मेसेज लिहिलेली पोस्ट त्याने टाकली होती. मात्र ही पोस्ट कोणासाठी आहे याचा उल्लेख केला नव्हता. 


तसेच हसनेनने आपल्या कुटुंबियातील सदस्यांचे तसेच स्वत:चे फोटो कधी सोशल नेटवर्किंग साईटवर अपलोड केले नाहीत अथवा कोणत्याही मित्राच्या पोस्टवर कधी कमेंट केली नव्हती. यूट्यूबवर हसनेनने दोन व्हिडीओजना लाईक केले होते. तर फेसबुकवर त्याचे २१ मित्र होते.