दारु ढोसण्यात पुणेकर `झिंगाट`
सांस्कृतिक शहर म्हणून आजपर्यंत पुण्याची ओळख आपण नेहमीच ऐकतो. पण दारु पिऊन झिंगाट होण्यामध्ये पुण्यानं पहिला क्रमांक मिळवला आहे.
पुणे: सांस्कृतिक शहर म्हणून आजपर्यंत पुण्याची ओळख आपण नेहमीच ऐकतो. पण दारु पिऊन झिंगाट होण्यामध्ये पुण्यानं पहिला क्रमांक मिळवला आहे. पुणे जिल्ह्यामध्ये गेल्या वर्षभरात राज्यातल्या इतर जिल्ह्यांपेक्षा जास्त देशी दारूची विक्री झाली आहे.
देशी दारुबरोबरच बीअर आणि विदेशी दारू विक्रीमध्येही पुण्यात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. पुण्यात गेल्या वर्षी 2 लाख 45 हजार 600 लिटर देशी दारुची विक्री झाली, तर 4 लाख 88 हजार 990 लिटर बीअर विकण्यात आली. मागच्या वर्षी 2 लाख 96 हजार 90 लिटर विदेशी दारूची पुण्यात विक्री झाली.
राज्य उत्पादन शुल्क विभागानं दारु विक्रीची ही आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.