पत्नीचा फोटो काढताना दरीत पडून पतीचा मृत्यू
उंचावर फोटो काढताना, एक छोटीशी चूक तुमच्या जीवावर बेतू शकते, हे दिसून आलं आहे.
सातारा : पत्नीचा फोटो काढताना दरीत पडून पतीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सज्जनगडावर घडली आहे. उंचावर फोटो काढताना, एक छोटीशी चूक तुमच्या जीवावर बेतू शकते, हे दिसून आलं आहे.
धनंजय आणि निलम फिरण्यासाठी सज्जनगडावर आले होते. यावेळी फोटो काढताना, पाय घरसल्यामुळे धनंजय दरीत कोसळला आणि त्याचा मृत्यू झाला.
साताऱ्यातील आंबवडे बुद्रुक गावातल्या धनंजय जाधव आणि निलम यांचं अवघ्या ४ महिन्यांपूर्वीच लग्न झालं होतं. निलमचा फोटो काढण्यासाठी धनंजय दरीच्या टोकावर उभा होता, असं सांगण्यात येतं.