जावेद मुलाणी, झी मीडिया, इंदापूर : इंदापूर तालुक्यातल्या उजनी बॅक वॉटर परिसरात सोलापूर जिल्ह्यातल्या माळशिरस तालुक्यातले 4 डॉक्टरांवर नियतीनं घाला घातलाय... होडी नदीत बुडाल्यानं चौघांचा जीव गेला... एनडीआरएफच्या जवानांची वाट पाहत न बसता स्थानिक मच्छिमार आणि गावक-यांनी शोधाशोध केली आणि सर्व मृतदेह बाहेर काढले. 
 


 पिकनिकला जाताय...सावधान...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

डॉ. सुभाष मांजरेकर, डॉ. अण्णा शिंदे, डॉ. चंद्रकांत उराडे आणि डॉ. महेश लवटे यांच्यासह 10 डॉक्टर्स उजनी बॅकवॉटर परिसरात पर्यटनासाठी आले होते... पण रविवारी होडी नदीत बुडाली... स्थानिक ग्रामस्थांच्या दक्षतेमुळे सहा जणांचे प्राण वाचले मात्र चौघांना जलसमाधी मिळाली. 


सेल्फी काढण्याच्या नादात ह्या डॉक्टरांनी आपला जीव धोक्यात घातल्याचं प्राथमिक तपासात पुढं आलंय... 


या दुर्घटनेत चार डॉक्टरांना आपला जीव गमवावा लागला असून या घटनेनं सोलापूर जिल्ह्यातला माळशिरस तालुका शोकसागरात बुडालाय...


उजनी बॅकवॉटरच्या परिसरातल्या या दुर्घटनेच्या निमित्तानं नदीतून प्रवास करताना बोटीतल्या एकाही व्यक्तीनं जॅकेट ट्युब किंवा इतर सुरक्षिततेची दक्षता न घेतल्यानं त्यांच्यावर हा प्रसंग ओढवल्याचं समोर आळंय. पर्यटनाला जाताना आपली सुरक्षितता जपणं आणि त्या दृष्टीनं आवश्यक ती खबरदारी घेणं गरजेचं आहे...अन्यथा एखादी छोटी चूकही आपल्या जीवावर बेतू शकते.