परभणी : परभणी जिल्ह्यातल्या दूधगावमध्ये जलयुक्त शिवार योजना राबवल्यामुळं  पावसाळा सुरू होण्यापूर्वीच गावाचा चेहरामोहरा बदलून गेलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या चार वर्षांच्या दुष्काळावर मात करण्यासाठी कृषी विभागानं जलयुक्त शिवार योजनेंतर्गत जुन्या बंधाऱ्याचं खोलीकरण आणि रुंदीकरणासह सरळीकरणाचं काम हाती घेतलंय. मात्र, हे काम सुरू असतानाच जोरदार मान्सूनपूर्व पाऊस बरसल्यामुळं बंधारा तुडुंब भरलाय.



विशेष म्हणजे या भरलेल्य़ा बंधाऱ्याचे फोटो खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करून कौतुक केलंय. 


जिंतूर तालुक्यातल्या दूधगावमधल्या या जलंसंधारणाच्या कामांमुळं शिवारातल्या विहिरी आणि बोरच्या पाण्याची पातळी वाढलीय. तसंच पाणीटंचाई कमी होण्यास मदत झालीय. दूधगावमधघ्ये ६१ लाख रुपये खर्चून चार बंधाऱ्याचं काम सुरू आहे.