नांदेड : नांदेड महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत कत्तलखान्याला परवानगी देण्याच्या मुद्द्यावरून जोरदार राडा झाला. शिवसेना आणि काँग्रेसचे नगरसेवक यामुदद्यावरून आमने-सामने आले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देगलूर नाका भागातल्या अल मॅफ्को कंपनीला कत्तलखान्यासाठी परवागनी हवी आहे. गेली दोन वर्ष हा विषय प्रलंबित आहे. शनिवारी हाविषय सभेच्या यादीत आला. 


शिवसेना आमदार हेमंत पाटील आणि त्याचे शिवसैनिक पालिकेसमोर जमा झाले. सभागृहात शिवसेना नगरसेवक तुलजेश यादव आणि अशोक उमरेकर यांनी महापौरांच्या समोरच्या बाकावर मांसाचे तुकडे टाकले. त्यावर माजी महापौर अब्दुल सत्तार उमरेकरांच्या अंगावर धावून गेले. सेना आणि काँग्रेसच्या नगरसेवकांमध्ये यावेळी जोरदार धक्काबुक्की झाली. 


याच गोंधळात महापौर शैलजा स्वामींनी कत्तलखान्यासह इतर विषयांना मंजूरी देऊन टाकली. या गोंधळातच राष्ट्रगीत सुरु करण्यात आलं.  सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे गोंधळी नगरसेवकांवर कारवाई करण्याचं आश्वासन महापौरांनी दिलंय.