कोल्हापूर : कोल्हापुरात ऊस दरासाठी बोलवली पहिली बैठक निष्फळ ठरली आहे. त्यामुळे कारखानदार आणि शेतकरी संघटना यांच्यामधील संघर्ष अटळ मानला जात आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऊसाला पहिली उचल 3200 रुपये मिळावी या मागणीवर  स्वाभिमानी शेतकरी संघटना कायम आहे. शेट्टींची मागणी कारखानदारांना अमान्य आहे. त्यामुळे शेतक-यांचं नुकसान होऊ नये यासाठी सुवर्णमध्य साधला जाईल असा विश्वास सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला आहे.


तर शेतक-यांचं हित लक्षात घेऊन लवकरच पुन्हा एकदा बैठक बोलावली जाणार असल्याची माहिती कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी दिली आहे.एकरकमी एफआरपी देणं हे कायद्यातच आहे. त्यामध्ये कारखानदारांनी नवीन काही केलं नाही. शेतक-यांना योग्य दर मिळाला नाही तर आक्रमक होण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं दिला आहे.


गळीत हंगाम 5 नोव्हेंबरपासून सुरु होतोय. त्यामुळे इतक्या कमी वेळात तोडगा काढणार कसा असा प्रश्न उभा राहतो आहे. तोडगा निघाला नाही तर कर्नाटक सीमेवरील कारखाने बाजी मारू शकतात, त्यामुळे कारखानदार आणि सरकारनं त्वरित निर्णय घेण्याची गरज आहे.