नाशिक : ईडीच्या अधिकाऱ्यांचं पथक थेट छगन भुजबळ यांच्या फार्म हाऊसवर पोहोचलं आहे. हे पथक छगन भुजबळ यांच्या फार्म हाऊसचा ताबा घेणार असल्याचं सांगण्यात येत आहे. छगन भुजबळ यांच्यासाठी हा मोठा धक्का आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एसीबीचं एक विशेष पथक देखील भुजबळ फॉर्महाऊसवर दाखल झालं आहे. नाशिकमध्ये आल्यानंतर याच ठिकाणी भुजबळांचं मुक्काम असे. 


या पूर्वी भुजबळांची जमीन ताब्यात घेण्याचे आदेश होते, त्या जमीनीला हायकोर्टात पुन्हा आव्हान देण्यात आलं होतं. आज ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयाचं पथक भुजबळांचं फार्म हाऊस ताब्यात घेण्यासाठी पोहोचलं आहे.


राष्ट्रवादीचे बडे नेते समजले जाणारे भुजबळ हे मागील अनेक महिन्यांपासून जेलमध्ये आहेत. भुजबळांनी राज्याचं गृहखातं आणि उपमुख्यमंत्रीपदही सांभाळलं होतं, मात्र आता भुजबळ अतिशय अडचणीत आले आहेत.