COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कैलास पुरी, झी मीडिया, पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवडच्या पिंपळे गुरव परिसरातल्या महापालिकेच्या रुग्णालयात कर्मचारी चक्क संगीत खुर्ची खेळत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय... त्यामुळं महापालिका रुग्णालयात रुग्णांकडे खरंच लक्ष दिलं जात का? असा सवाल उपस्थित झालाय.


 पिंपरी चिंचवड महापालिकेच्या पिंपळे गुरवमधल्या काशीद रूग्णालयात आरोग्य अधिकारी आणि कर्मचारी चक्क संगीत खुर्ची खेळत आहेत. एका व्यक्तीने रूग्णालयात सुरू असलेला हा प्रकार मोबाईलमध्ये शूट केला. रूग्णालयात असे प्रकार होतातच कसे असा प्रश्न यामुळे समोर आलाय. रूग्णालयाच्या प्रशासनानेही हा प्रकार घडल्याचं मान्य केलंय. मात्र रूग्णालयाची वेळ संपल्यावर संगीत खुर्ची खेळल्याचं प्रशासन म्हणतंय. हा प्रकार गणपती उत्सवाच्या काळात घडलाय. 


राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशात आरोग्य सेवेचा बोजवारा का उडालाय याचं उत्तर ही संगीत खुर्ची पाहीली की लक्षात येईल. सरकारी नोकरी असल्याने ती जाण्याची भिती संगीत खुर्ची खेळणा-यांना नाही आणि वरिष्ठांना या प्रकाराशी काही देणं घेणं नाही. अशा स्थितीत आरोग्य सेवेचीच संगीत खुर्ची झाल्यास आश्चर्य वाटायला नको