मुंबई : महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी अशी पुणे शहराची ओळख आहे. याच पुणे शहरातील एक अजब घटना घडली. कर्वे रोडवरील गजबजलेल्या परिसरात गेल्या आठवड्यात मोठ्या स्क्रीनवर अचानक पॉर्न फिल्म सुरु झाली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एका डिजीटल होर्डिंगवर दिवसाढवळ्या पॉर्न फिल्म सुरु झाल्याने वाहतुकीचे चांगलेच तीनतेरा वाजले. एका व्यक्तीने ट्विटरवरुन याची माहिती दिल्याने ही घटना समोर आली. या घटनेची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगलीये. 


कर्वे रोड़वर नेहमीप्रमाणे गजबजलेला होता. मोठ्या प्रमाणात वाहनांची गर्दी होती. मात्र त्याचवेळी अचानक गर्दी एका ठिकाणी थांबली. होर्डिंगवरील लाल अक्षरे दिसेनाशी झाली आणि पॉर्न फिल्म सुरु झाल्याने वाहतूक तिथेच थांबली. दरम्यान, तांत्रिक बिघाडामुळे ही घटना घडल्याचे संबंधित व्यक्तीने सांगितले.