अलिबाग : रायगडावर 10 आणि 11 एप्रिलला शिवपुण्यतिथी अभिवादन कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे. श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ आणि स्थानिक उत्सव समिती महाडमार्फत हा कार्यक्रम आयोजित केला जातोय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे उपस्थित राहणार आहेत. दोन दिवसीय कार्यक्रमात पुरस्कार प्राप्त मान्यवरांच्या मुलाखती, किर्तन, छत्रपती शिवाजी महाराज समाधीचं पूजन करण्यात येणार आहे. पालखी मिरवणूक, मराठा रेजिमेंट बँडचे वादन आणि रायगड जिल्हा पोलिसांतर्फे बंदुकीच्या २१ फैरी हे या कार्यक्रमाचं प्रमुख आकर्षण असणार आहे. 


दरम्यान या पुण्यतिथीला ढोलवादनाचं आयोजन केल्यामुळं जोरदार टीका करण्यात आली होती. त्यामुळं शासनानं अखेर हा ढोलवादानाचा कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती सांस्कृतिकमंत्री विनोद तावडेंनी विधानपरिषदेत दिली.